यशस्वी मार्गदर्शन करणारे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सचिव महोदय, व व्यवस्थापकीय संचालक हे महाराष्ट्रातील गायींच्या आर्थिक प्रगतीसाठी अथक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ग्रामीण भागात गोपालन क्षेत्रात सशक्त बदल घडून येत आहेत.
अधिक माहितीपशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग द्वारा आयोजित
गोधारित शेतीचा प्रचार प्रसार करणे आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे.
महाराष्ट्रातील गोशाळा स्वावलंबी (आत्मनिर्भर) बनविण्यासाठी मार्गदर्शन.
गोबर-गोमूत्रापासून तयार होणाऱ्या गोमय मूल्यवर्धन उत्पादनांचा प्रसार.
पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार.
गोशाळा संचालक आढावा बैठक, पशुसंवर्धन विभाग व गोशाळा समन्वय.
पोलिस प्रशासन व गोरक्षक यांच्यातील समन्वय साधणे व बळकट करणे.
संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याचा प्रचार, प्रसार व कडक अंमलबजावणी.
देशी गोवंश पालन पोषण संदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे.
राज्यमाता-गोमाता धोरणांतर्गत गोशाळांचे शाश्वत आर्थिक केंद्रांमध्ये रूपांतर.
| अ.क्र. | दिनांक | सकाळचे सभेचे ठिकाण | दुपारच्या सभेचे ठिकाण |
|---|---|---|---|
| १ | २३ जून २०२६ | अहिल्यानगर | छ.संभाजीनगर |
| २ | २४ जून २०२६ | जळगाव | धुळे |
| ३ | २५ जून २०२६ | नाशिक | ठाणे |
| ४ | २६ जून २०२६ | रायगड | सिंधुदुर्ग |
| ५ | २७ जून २०२६ | कोल्हापूर | सोलापूर |
| ६ | २८ जून २०२६ | लातूर | नांदेड |
| ७ | २९ जून २०२६ | परभणी | बीड |
| ८ | ३० जून २०२६ | जालणा | बुलढाणा |
| ९ | ०१ जुलै २०२६ | अकोला | यवतमाळ |
| १० | ०२ जुलै २०२६ | अमरावती | यवतमाळ |
| ११ | ०३ जुलै २०२६ | वर्धा | चंद्रपूर |
| १२ | ०४ जुलै २०२६ | गोंदिया | भंडारा |
| 🏁 ०५ जुलै २०२६ — समारोप : नागपूर | |||

महाराष्ट्रात दरवर्षी ७५ ते ८० लक्ष टन सोयाबीन कुटार उपलब्ध होते. पारंपरिक चाऱ्यापेक्षा यात ३ पट अधिक प्रथिने असूनही गैरसमजामुळे शेतकरी ते जाळतात. मूल्यवर्धक प्रक्रियेने पचनक्षमता ६०% वाढते!
गोसंगोपन, गोसंवर्धन आणि मुख्यत्वे गोसंरक्षण हे किती महत्वाचे आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले.
एवढेच नाही तर प्राकृतिक शेती या विषयांवर जी कार्यशाळा आदरणीय राज्यपाल देवव्रतजी यांनी मांडली त्यामध्ये देखील शेवटचे समाधान हे देशी गोवंशच आहे याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आणि जबाबदारी आहे की देशी गोवंशाचे पालन, पोषण व संरक्षण हे झालेच पाहिजे आणि गोहत्या बंदी कायदा कडक पद्धतीने महाराष्ट्रात लागू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी येणार्या काळात अधिक प्रभावीपणे करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ठरविले आहे.
— महाराष्ट्र गोसेवा आयोग
राज्यमाता गोमाता संवाद यात्रा माहिती / फोटो, गोशाळा नोंदणी, देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान योजना अर्ज, सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अर्ज, साप्ताहिक हजेरी आणि इतर सरकारी सेवा आता तुमच्या मोबाइलवर — सोप्या आणि सुलभ पद्धतीने.


— महाराष्ट्र गोसेवा आयोग

गोपाष्टमीचा आनंद साजरा करा । भारतीय संस्कृतीत पहिला गोपालक म्हणजे गोविंद, तोच श्रीकृष्ण ...


देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान योजना. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना.
अधिक माहिती
संबंधित कायदे अंमलबजावणी: आयोग गोवंशाच्या हत्या विरोधी कायदे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करतो.
अधिक माहिती